धर्म, पर्यटन आणि आस्था यांना एकत्र अनुभव देणारा कुंभमेळा पुन्हा एकदा नाशिकमध्ये 2027 मध्ये होणार आहे. या महाधर्मयात्रेला लाखो भक्तिक पांथां गोदावरी नदीत स्नान करून आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करीत. महाराष्ट्राच्या हृदयात होणाऱ्या या 12 वर्षांनी एकदा येणाऱ्या पर्वात सहभागी व्हा.
नाशिक, महाराष्ट्र
गोदावरीच्या पवित्र तीरावर स्थित नाशिक हे या भक्ती पर्वाचे प्रमुख केंद्र आहे.
सिंहस्थ कुंभच्या आध्यात्मिक आणि प्रशासनिक तयारीची भव्य सुरुवात
१ जून २०२५: महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत विविध आखाड्यांच्या महंतांकडून मंत्रोच्चारात करण्यात आले. आध्यात्मिक वातावरणात, नाशिक जिल्ह्यातील जनप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व सर्व प्रमुख महंतांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा औपचारिक शुभारंभ झाला आणि या मेळ्याच्या अधिकृत तारखा जाहीर करण्यात आल्या. पोलीस आयुक्त मा. संदीप कर्णिक (भा.पो.से.) यांनी मा. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे स्वागत केले व मेळ्याच्या तारखा जाहीर करण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्यांचे आगमन झाल्याबद्दल आभार मानले. नाशिक पोलिसांच्या वतीने त्यांनी उपस्थित अखाडा परिषदेच्या महंतांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांच्या शुभाशीर्वादांची मागणी केली. तांत्रिकदृष्ट्या प्रगत सिंहस्थ कुंभ २०२७ च्या दिशेने नाशिक पोलिसांचे पाऊल.
७ मे २०२५: मा. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने सिंहस्थ कुंभमेळा २०२६–२७ हा ‘तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत कुंभमेळा’ म्हणून साकार करण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिक शहर पोलीस दलाने या दृष्टीने पुढाकार घेत, Microsoft व इतर भागीदार संस्थांच्या सहकार्याने एआय/एमएल (AI/ML) तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जात आहेत, जेणेकरून पोलीस व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल आणि भाविकांसाठी कुंभमेळ्याचा अनुभव अखंड, सुरक्षित आणि सुकर ठरेल. नागरिक संघटना, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शैक्षणिक संस्था आणि इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण उपाय अथवा सूचना आहेत व या कुंभमेळ्यात योगदान देऊ इच्छितात, त्यांनी सीपी व्हॉट्सअॅप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर संदेश पाठवावा. पुणे विद्यापीठ आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमान.
५ एप्रिल २०२५: सिंहस्थ कुंभमेळा २०२६–२७च्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राचार्य, एनएसएस व एनसीसी अधिकारी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी मा. डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये २०० हून अधिक महाविद्यालयीन प्राचार्य, एनएसएस आणि एनसीसी अधिकारी सहभागी झाले होते.
चर्चिलेले प्रमुख मुद्दे :
🔸 विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, चेंगचराचेंगरी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देणे
🔸 योजनांची प्रभावी अंमलबजावणी व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा योग्य वापर
🔸 प्राचार्यांचा सक्रीय सहभाग व भावी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे समन्वय
नाशिक शहर पोलीस दलास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेसोबत अधिकृत भागीदारी करत असल्याचा अभिमान आहे. विद्यापीठाच्या टीम्स कुंभमेळा २०२६–२७ साठी नियोजन, सल्लामसलत व अंमलबजावणीत नाशिक पोलिसांसोबत कार्यरत असतील. हा कुंभमेळा 'देवभूमी नाशिक' येथे आयोजित होणार आहे.







