सामान्य माहिती
फ्लॅट/घर भाड्याने देण्यासाठी पोलीस एनओसी आवश्यक नाही.
नागरिक फ्लॅट/घर भाड्याने दिल्याची माहिती नाशिक शहर पोलिसांना खालीलपैकी कोणत्याही मार्गाने देऊ शकतात -
ऑनलाइन अर्ज करून, किंवा
संबंधित पोलीस स्टेशनमध्ये थेट अर्ज सादर करून, किंवा
नोंदणीकृत पोस्टद्वारे संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज पाठवून.
ही ऑनलाइन सेवा नागरिकांना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या फ्लॅट/घर भाड्याने दिल्याची माहिती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फ्लॅट/घर मालकाच्या संपर्क क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
मालकाचा पत्ता आणि भाड्याने दिलेल्या मालमत्तेचा पत्ता एकसारखा नसावा.
मालक आणि भाडेकरू यांनी येथे दिलेली माहिती खरी असल्याची खात्री करावी.
पोलीसांना खोटी माहिती देणे हा दंडनीय गुन्हा आहे. सादर केलेल्या माहितीत कोणतीही तफावत आढळल्यास संबंधित अर्जदार/मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. जोडले आहे - नाशिक शहर पोलीस वेबसाइटवरील भाडेकरू माहिती पृष्ठ थेट उघडण्यासाठी बारकोड.