ताणतणाव व्यवस्थापन

नियमित बंदोबस्त, गुन्हयांचा तपास, दैनंदिन कामकानात पोलीस अधिकारी / अंमलदारांचा तणाव वाढत असल्याने ताण तणाव व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वैदयकिय अधिका-यांसह मानसोपचार तज्ञांच्या मदतीने आयुक्तालय व पोलीस ठाण्यांमध्ये नियमित कार्यशाळा घेण्यात येतात. यामध्ये विशेष म्हणजे अधिका-यांनी अंमलदारांशी मनमोकळा संवाद कसा ठेवावा याचाचत सुचित करण्यात येत आहे.